पाहा Photos : "हॅपी बर्थडे मुन्ना" म्हणत सिद्धार्थ चांदेकरने मृण्मयीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

आपल्या अभिनय कौशल्याने मराठी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, चाहते आणि मित्रमंडळींकडून मृण्मयीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. यातच तिच्या खास मित्राने तिला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची फार जुनी मैत्री आहे. दोघांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये एकत्र कामही केलय. हमने जीना सिख लिया, पोपटी चौकट, अग्निहोत्र, मिस यू मिस्टर या प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघं एकत्र झळकले आहेत.

सिद्धार्थने सोशल मिडीयावर पोस्ट शेयर केली आहेत. या पोस्टमध्ये त्याने मृण्मयीसोबत केलेल्या कामांची फोटोरुपी आठवण शेयर केली आहे.

 

सिद्धार्थ लिहीतो की, "2006 पासून कायमचे. तुझ्यासारखी मैत्रीण असणं म्हणजे आयुष्य अधीक सुंदर होतं. वाढदिवसाच्या शुभेच्छा मुन्ना. माझं तुझ्यावर कायम प्रेम आहे. 1. हमने जीना सिख लिया. 2. पोपटी चौकट 3. अग्निहोत्र 4. मिस यू मिस्टर आणि अजून बरेच यायचे आहेत.."

सिद्धार्थने या पोस्टमधून मृण्मयीसोबत केलेल्या कामांच्या खास आठवणींना उजाळा दिला आहे.

 
 

Recommended

Loading...
Share