By  
on  

पाहा Photos : रिंकू राजगुरुचे हे फोटो पाहिलेत का ? साडी लुकमध्ये रिंकूचा हटके अंदाज

'सैराट' फेम रिंकू राजगुरुने विविध भूमिकांमधून आता तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडीयावर सक्रिय असलेल्या रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. या सोशल मिडीयावर रिंकूचं साडी प्रेम अनेकदा पाहायला मिळतय. 

रिंकू अनेकदा साडी लुकमधील फोटो शेयर करते. या लुकमधील तिचे विविध फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

रिंकूने नुकतेच काही ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो शेयर केले आहेत. यात रिंकूचा हटके लुक पाहायला मिळतोय. 

या फोटोंमध्येही रिंकूचा साडी लुक आहे. चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव केला आहे. रिंकूने विविध मराठी चित्रपट आणि वेबसरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आगामी काळात 'छूमंतर', 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive