अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कमी वयातच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. 1988 पासून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत विविध चित्रपटांतून काम केलय. मात्र नुकतच त्यांनी त्यांच्या एका चित्रपटाची आठवण करुन दिली आहे. या चित्रपटाविषयी खास आठवण प्रिया यांनी सोशल मिडीयावर शेयर केली आहे.
'शेम टू शेम' या चित्रपटाची आठवण प्रिया यांनी शेयर केली आहे. या चित्रपटात त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झळकल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत प्रिया यांनी लग्नाआधी अनेक चित्रपट केले त्यापैकीच हा एक. 1990 मध्ये आलेल्या या चित्रपटात प्रिया पहिल्यांदा डबर रोल म्हणजेच दुहेरी भूमिकेत झळकल्या होत्या.
या पोस्टमध्ये त्या लिहीतात की, "शेम टू शेम .. 1990 ची फिल्म माझं वय फक्त 20 वर्ष.. माझ्या केसांच्या स्टाईल मुळे पुरु मला वहिदा अरुण म्हणायचा.. ही फिल्म करणं माझ्या साठी कमाल आणि धमाल अनुभव होता, माझा पहिला डबल रोल, खूप नाच , खूप गाणी .. आणि उत्तम टीमवर्क"
पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शिक केलेल्या 'शेम टू शेम' चित्रपटाची आठवण सांगताना वयाच्या 20 व्या वर्षी केलेल्या या चित्रपटाने प्रिया यांना कमाल अनुभव दिल्याचं त्या या पोस्टमध्ये सांगतात. 1998 मध्ये प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लगीनगाठ बांधली होती. त्यानंतरही अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. मात्र