मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा भोगणारा अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या वकिलांनी नुकतीच 'संजू' सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. हा सिनेमा पाहून त्याची सटकली आहे. संजूमधील काही दृश्यावर त्याला आक्षेप असून त्याच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी अबू सालेम याची माफी मागावी अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1022677739235667969
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा जीवनपट उलगडणारा संजू सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आता सिनेमाला जारी करण्यात आलेल्या या नोटीसद्वारे 15 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.15 दिवसांत जर माफी मागितली नाही तर निर्मात्यांविरुध्द अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे.
अबू सालेम आणि त्याच्या वकिलांनी सिनेमाचे निर्माते राजकुमार हिरानी आणि निर्माते विधू विनोद चोप्रा सहित डिस्ट्रिब्यूटर आणि प्रोडक्शन कंपनीला नोटीस पाठवून त्याला वाटणारे आपत्तीजनक दृश्य हटवण्यास सांगितले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तवर खटला सुरू होता आणि आर्म्स कायद्याअंतर्गत त्याने शिक्षासुध्दा भोगली.
‘संजू’ 2018 मधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सिनेमात संजय दत्तची व्यक्तिरेखा हुबेहूब आणि अप्रतिमरित्या साकारल्याने रणबीर कपूरवर कौतुकाचा वर्षाव झाला. आता सिनेमा प्रदर्शनाच्या इतक्या दिवसानंतर ही नोटीस आल्यामुळे नेमकं काय होणार, कुठली पावलं उचलली जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.