By  
on  

तेजस्विनी पंडित करतेय 'समांतर -2' साठी डबिंग, लवकरच सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

मागील वर्षी आलेल्या 'समांतर' या वेबसिरीजने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'सुहास शिरवळकर' यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत झळकलाय. या कथेतील कुमार महाजन हे पात्र त्याने साकारलय. त्याच्या नशीबाभोवती फिरणारी ही कथा एक रंजक वळणावर येते. पुढे या सिरीजमध्ये काय होतं हे या सिरीजच्या आगामी दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. लवकरच 'समांतर - 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सिरीजमध्ये कुमार महाजनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

या सिरीजचा दुसरा भाग समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलाय. सध्या या सिरीजमधील कलाकार डबिंगमध्ये व्यस्त आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही सध्या या सिरीजसाठी डबिंग करत असल्याचं समोर आलय. तेजस्विनीने सोशल मिडीयावर तिच्या डबिंगचा फोटो शेयर केला आहे. 

या सिरीजमधील तेजस्विनीची भूमिकाही लक्षवेधी ठरली होती. स्वप्निल आणि तेजस्विनीने या सिरीजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. आता या सिरीजचा दुसरा भाग कधी येतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल यात शंका नाही. सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतल्यानंतर कुमार महाजनचं आयुष्य कसं बदलतं आणि पुढे या कथेत काय घडेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive