By  
on  

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेहा पेंडसे म्हणते "मी प्‍लास्टिकचा वापर कमी केलाय"

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील पर्यांवरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी देनंदिन जीवनात कोणत्या वस्तूंचा वापर ती कमी करतेय याविषयी सांगीतलय. शिवाय सस्टेनेबल राहणीमानाबाबतही तिचं मत व्यक्त केलं आहे. 

 नेहा ही सध्या भाबीजी घर पर है या लोकप्रिय मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारतेय. या भूमिकेत तिला पसंत केलं जातय. विविध मराठी-हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्यानंतर नेहा अनिता भाभीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेहा म्हणते की, "सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे आणि सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे. हरित पद्धतींचा अवलंब हा आपल्‍या भूमातेचे संवर्धन व संरक्षण करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. यासंदर्भात मी प्‍लास्टिकचा वापर कमी केला आहे आणि त्‍याऐवजी माझ्या किराणा माल व इतर आवश्‍यकतांसाठी प्‍लास्टिक-मुक्‍त पर्यायांचा वापर करते. मी सोबत सुती किंवा तागाच्‍या पिशव्‍या घेऊन जाण्‍याची काळजी घेते. ऊर्जेसंदर्भात मी इन्‍कॅन्‍डेसण्‍ट लायटिंगऐवजी एलईडी लायटिंग किंवा सीएफएल बल्‍ब्सचा वापर करते, कारण हे दीर्घकाळापर्यंत टिकतात आणि ऊर्जेची बचत करतात. याव्‍यतिरिक्‍त मी नैसर्गिक प्रकाशाला देखील प्राधान्‍य देते, ज्‍यामुळे ऊर्जासंवर्धनामध्‍ये मदत होण्‍यासोबत काहीशा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्‍यामध्‍ये देखील मदत होते. आपल्‍या रोजच्‍या सवयींमधील हे लहानसे बदल आपल्‍याला पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक बनवू शकतात आणि मोठे परिवर्तन घडून येऊ शकते.'' 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive