By  
on  

पाहा Video : प्रिया मराठेचा हा तलवारबाजी व्हिडीओ एकदा पाहाच

मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी प्रिया सोशल मिडीयावर विविध पोस्ट करते. प्रियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रिया तलवारबाजी करताना दिसत आहे.

 

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत प्रिया रायबागणच्या भूमिकेत दिसतेय. यासाठी प्रिया घोडेस्वारी, तलवारबाजी करताना दिसतेय. म्हणूनच असाच एक तलवारबाजी करतानाचा व्हिडीओ प्रियाने शेयर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय. 

'या सुखांनो या' या मालिकेतून प्रियाने टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अनेक मराठी-हिंदी मालिका तिने केल्या आहेत. पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. मराठी-हिंदी मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमातून प्रियाने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतील रायबागण या पात्रातूनही ती लक्षवेधी ठरतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive