By  
on  

"आता काय करावं बरं ?" म्हणत उमेश कामतने चाहत्यांना विचारला हा प्रश्न 

नाटक, मालिका आणि चित्रपट माध्यमातून अभिनेता उमेश कामतने नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. वेबसिरीज या माध्यमातूनही उमेशने काम केलं. आणि काय हवं या वेबसिरीजमध्ये उमेश आणि खऱ्या आयुष्यातील पत्नी प्रिया बापट यांची जोडी पाहायला मिळाली. लवकरच या सिरीजचं तिसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच महराष्ट्रात अनलॉक जाहीर करण्यात आलय. आता मनोरंजन विश्वातील कलाकारही पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. तेव्हा उमेश कामतने चाहत्यांना एक खास प्रश्न विचारला आहे.

उमेशने सोशल मिडीयावर त्याचा फोटो शेयर केलाय. यासोबत कॅप्शनमध्ये उमेश प्रश्न विचारतो की, "आता काय करावं बरं ? नविन नाटक, चित्रपट, टिव्ही मालिका, वेब सिरीज ...? तुम्हाला काय वाटतं? कमेन्ट्समध्ये सांगा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

तेव्हा लवकरच उमेश एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं चित्र पाहायला मिळतय. मात्र उमेशने हा प्रश्न विचारून प्रेक्षक आणि त्याच्या चाहत्यांकडून त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आगामी काळात प्रेक्षकांना उमेश कोणत्या माध्यमात पाहायला आवडेल याचं उत्तर त्याला या पोस्टमधून मिळतय. उमेशच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स देऊन त्यांच्या प्रतिक्रिया आणि उत्तर कळवलय. या पोस्टवर कुणी नाटक, मालिका, चित्रपट तर कुणी वेबसिरीज असं उत्तर दिलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive