By  
on  

पुष्कर जोग आणि मानसी नाईकच्या या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण

बॅटमॅन, सुपरमॅन, क्रिश यासारखे सुपरहिरो इंग्रजी आणि हिंदी चित्रपटात पाहायला मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी सिनेमातला पहिला सुपरहिरो पाहायला मिळाला तो 'जबरदस्त' या सिनेमात. एक जादुई कोट घालून माणूस कसा सुपरहिरो बनतो हे या सिनेमात पाहायला मिळालं होतं. त्या जादुई कोटने काय धमाल येते हे या सिनेमात पाहणं रंजक ठरतं. अभिनेता पुष्कर जोग यात मुख्य भूमिकेत झळकला होता. 

पुष्करसह या सिनेमात मानसी नाईक, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, किशोरी अंबिये, प्रिया बेर्डे, विजय चव्हाण, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रसिका जोशी, महेश कोठारे, सुनील तावडे हे कलाकारही झळकले होते. महेश कोठारे दिग्दर्शित या सिनेमात कॉमेडी, डान्स, गाणी, ट्व्सिट असा मसाला पाहायला मिळाला होता. या सिनेमाला नुकतीच 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

या सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलय. त्यामुळे सिनेमाच्या कहाणीसह सिनेमाची गाणी चांगलीच लक्षवेधी ठरली होती.  या सिनेमातून मानसी नाईकने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. मानसीच्या सौंदर्याने आणि नृत्यकौशल्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

पुष्करचा जबरदस्त डान्स, इतर तगडी स्टारकास्ट, कॉमेडी, गाणी या सगळ्या वैविध्यपूर्ण गोष्टींमुळे हा सिनेमा मनोरंजक ठरला होता. पुष्कर जोगला या सिनेमातून एक वेगळी ओळख मिळाली होती. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. 

Recommended

PeepingMoon Exclusive