By  
on  

'सारेगमप लिटिल चॅम्प'साठी कलाकारांचं हटके प्रमोशन, शेयर केले लहानपणीचे गोंडस फोटो

लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सुरेल बच्चेकंपनी येणार आहे. म्हणजेच 'सारेगमप लिटिल चॅम्प' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून बच्चेकंपनीला आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमाचा नवा प्रमोशनल फंडा सोशल मिडीयावर सध्या पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर काही कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेयर केले आहेत. यासोबतच खास कॅप्शनही लिहीलय. कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचं काय स्वप्न होतं हे या पोस्टमध्ये लिहीलय. त्यामुळे कलाकारांचे लहानपणीचे गोंडस फोटोही यानिमित्ताने पाहायला मिळत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या लहानपणीचा फोटो शेयर केला आहे. स्वप्निलने बालकलाकार म्हणून काम केलं असल्याने त्याने लव कुश मालिकेतील त्याच्या पेहरावातील फोटो पोस्ट केला आहे. स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो की, "लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अ‍ॅक्टर बनायचं."

अभिनेता शशांक केतकरनेही त्याचं लहानपणीचं स्वप्न सांगीतलय. शशांकने त्याच्या लहानपणीचे दोन फोटो शेयर करत त्याची स्वप्न लिहीलय. "लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं'सैनिक' होण्याचं" असं म्हणत त्याने ही पोस्ट शेयर केली आहे.

 

तर अभिनेत्री श्रेया बुगडेला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न असल्याचं तिने पोस्टमध्ये सांगीतलं.

 

अभिनेत्री गौतमी देशपांडेने तर कमाल गोंडस फोटो शेयर केला आहे. गौतमीच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. ती लिहीते की, "लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं एअरोनॉटिकल सायनटीस्ट बनायचं."

 

'कारभारी लयभारी' फेम अभिनेता निखिल चव्हाणला देखील लहानपणापासूनच अभिनेता बनण्याची इच्छा होती. तो लिहीतो की, "लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं ॲक्टर बनायचं."

 

यासह अनेक कलाकारांनी लिटिल चॅम्पच्या प्रमोशनसाठी त्यांचे लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांची लहानपणीची स्वप्ने सांगीतली आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. तर आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे प्रसिद्ध गायक-गायिका या कार्यक्रमाचे ज्युरी असतील. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive