By  
on  

करीना कपूरसोबत 'देव' सिनेमात झळकली होती ही मराठमोळी अभिनेत्री, सिनेमाला 17 वर्षे पूर्ण

'देव' या हिंदी सिनेमाला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, करीना कपूर आणि फरदीन खान या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमात करीनाचं काम लक्षवेधी ठरलं होतं. यासाठी करीनाला फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटीक अवॉर्डही मिळाला होता. गोविंद निहलानी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याच सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री अमृता सुभाष या सिनेमात झळकली आहे. या सिनेमात अमृताने कुरेशी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अमृताने करीनासोबत काम केलं होतं. 

अमृतानेही सोशल मिडीयावर या सिनेमाची फोटोरुपी आठवण शेयर केली आहे.  2004 मध्ये आलेल्या या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता.

अमृताने मराठी नाटक, मालिका, सिनेमांसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ओटीटी विश्वात अमृता तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकतेय. नेटफ्लिक्सच्या 'धमाका' या आगामी वेबसिरीजमध्येही अमृता झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive