By  
on  

प्रसाद ओक यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन, नाव ठेवलं मस्कारा

पाळीव प्राणी हे आपल्या कुटुंबाचाच भाग होऊन जातात. ते घरातील एक सदस्य बनून जातात. या प्राण्यांमुळे घरात एक सकारात्मक वातावरण तयार होते.  मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना प्राण्यांची आवड आहे. यातीलच एक ओक कुटुंब. प्रसाद ओक आणि त्यांच्या कुटुंबालाही प्राण्यांची प्रचंड आवड आहे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या कुटुंबात नव्या सदस्याला सामावुन घेतलय. 

या ओक कुटुंबात आता नव्या सदस्याचं आगमन झालय. या सदस्याने ओक कुटुंब आनंदी झालय. ही आहे एक गोंडस पेट डॉग. तिचं नाव मस्कारा असं ठेवण्यात आलय. प्रसाद ओक यांनी नुकताच त्यांच्या मुलासोबतचा या नव्या सदस्याचा फोटो शेयर केला आहे. 

प्रसाद ओक यांनी पोस्टमध्ये लिहीलय की, "ओक कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन...!!!तिचं नाव आहे मस्कारा"

या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या गोंडस सदस्याच्या आगमनाने प्रसाद ओक यांच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालं असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive