मकरंद अनासपुरे यांना या जवळच्या मित्राकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मकरंद अनासपुरे याचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. म्हणूनच विनोदी अभिनेता म्हणून त्यांची खास ओळख आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांसोबत त्यांनी काम केलय. काही कलाकार तर त्यांचे अगदी जवळचे मित्रही आहेत. अशाच एका जवळच्या मित्राकडून मकरंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.

अभिनेता भरत जाधव यांनी मकरंद अनासपुरे यांना खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भरत यांनी मकरंदसोबतचा फोटो शेयर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. भरत लिहीतात की, "प्रिय मकरंद... वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!"

भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केलय. मराठी सिनेमात या दोघांची जोडी लोकप्रिय आहे. 'साडे माडे तीन' या सिनेमातील त्यांचं एकत्र कामही प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

Recommended

Loading...
Share