पाहा Video : 'जून' सिनेमाचा नवाकोरा ट्रेलर प्रदर्शित

By  
on  

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच जून सिनेमाचा नवाकोरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

या सिनेमात नेहा पेंडसे  बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वैभव खिस्ती आणि सुहरुद गोडबोले यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलय. 

 

या सिनेमाच्या निमित्ताने नेहा पेंडसे बायस आणि सिद्धार्थ मेनन ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. ट्रेलरमध्ये दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळतेय. 

या सिनेमाची गाणी निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केली असून गायिका शाल्मली खोलगडेने या गाण्यांना संगीत दिलय. येत्या 30 जूनला हा सिनेमा प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. 

Recommended

Loading...
Share