By  
on  

"फक्त काहीच दिवस बाकी..." म्हणत तेजस्विनी पंडितने शेयर केला हा फोटो

2020 मध्ये आलेल्या 'समांतर' या वेबसिरीजने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर या सिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक वाट पाहत होते. तेव्हा 'समांतर 2' चा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 1 जुलै रोजी 'समांतर 2' प्रदर्शित होत आहे. या सिरीजमधून अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केलय. स्वप्नील जोशी या सिरीजमध्ये कुमार महाजन हे पात्र साकारतोय तर तेजस्विनी या सिरीजमध्ये निमा महाजनच्या भूमिकेत झळकतेय. 

निमा महाजन ही कुमारची पत्नी असून मध्यवर्गीय कुटुंबातील या जोडप्याला एक मुलगाही आहे. घरचा आणि मुलाचा खर्च नीट पुरवला जात नसल्याने निमा ही सतत कुमारला याची जाणीव करुन देतानाही दिसते, तर त्याच्या पाठिशी ती खंबीरपणे उभी आहे. या सगळ्यात भुतकाळ आणि भविष्याचा संगम या कहाणीत पुढे कसा जातो हे दुसऱ्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या सिझनमध्ये तेजस्विनीला निमाच्या भूमिकेत पसंती मिळाली होती. तेजस्विनीच्या कामाचही कौतुक झालं होतं. सहकलाकार म्हणून या सिरीजमध्ये असतानाही तेजस्विनी प्रत्येक सीनमध्ये निमाचं पात्र उत्तम साकारताना दिसते. आता 'समांतर 2' मध्येही निमा या पात्रातील अनेक पैलु पाहायला मिळतील असच चित्र पाहायला मिळतय. 

 

तेजस्विनीने नुकतच निमा महाजन या पात्रातील तिचा फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "निमा महाजन, समांतर 2.. फक्त काहीच दिवस बाकी.....1 जुलै पासून एम एक्स प्लेयरवर"

निमाच्या व्यक्तिरेखेतील तेजस्विनीचा वेगळा लुक या फोटोत पाहायला मिळतोय.  'समांतर 2' मध्ये आता काय काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive