By  
on  

"आता मित्र झालाय" म्हणत सिद्धार्थ चांदेकरला पुन्हा पाहायला मिळाली बिबट्याची झलक

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची सोशल मिडीया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने अशीच एक पोस्ट केली होती. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली हे संजय गांधी नॅशनल पार्कजवळ राहतात. त्यामुळे त्याच्या घराच्या जवळच त्यांना विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी चक्क बिबटच्याचं जवळून दर्शन घेतलं होतं. एवढच नाही तर सिद्धार्थने त्या बिबटचा फोटोही क्लिक केला होता. आता पुन्हा एकदा त्या बिबट्याची झलक सिद्धार्थला पाहायला मिळालीय.

सिद्धार्थ चांदेकर म्हणतो की "आता तो मित्र झालाय". सिद्धार्थने पुन्हा एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्या बिबट्याचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आलाय. पुन्हा बिबट्याच्या आगमनाने त्याच्या व्हिडीओ काढण्यात आला. हा तोच बिबट्या आहे ज्याने काही वर्षांपूर्वी ठाण्याच्या कोरम मॉल येथे हजेरी लावली होती. ही माहिती स्वत: सिद्धार्थने या पोस्टमधून दिली आहे.

 

सिद्धार्थ लिहीतो की, "कोऱ्या. काल रात्री परत आला होता. त्याचं हे नाव पडलंय कोरम मॉल वरून. 2019 मध्ये ठाण्याच्या कोरम मॉल मध्ये हे साहेब शिरले होते. त्याला तिकडून वाचवलं आणि एक ट्रॅकिंग चिप बसवून पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडून दिलं. त्याला वनविभाग वाले L-86 म्हणून ओळखतात. माझ्या घरामागे कायम येत असतो हा. आता मित्र झालाय. कोऱ्या. त्याच्यावर लाईट आम्ही मारत नव्हतो. आमच्याकडे अशी बॅटरी नाही. सांगून ठेवलं."

सिद्धार्थ या बिबट्याला कोऱ्या नावाने संबोधतोय. वनविभागाने L-86 अशी ओळख त्याला दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनाने सिद्धार्थला आनंद झाल्याचं या पोस्टमधून पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive