By  
on  

पाहा Video : "जेव्हा चाँदनी चौक महाराष्ट्राला भेटतं तेव्हा.. " म्हणत अंकित मोहनने शेयर केले लग्नातील ते खास क्षण

'फर्जंद' या मराठी चित्रपटानंतर अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमधून लोकप्रिय ठरलेल्या अंकितला मराठीतही लोकप्रियता मिळतेय. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेश विषयी विविध गोष्टी अंकित सोशल मिडीयावर पोस्ट करतो. मात्र सगळ्यात जास्त लक्ष वेधतात ते अंकितच्या पत्नी रुचिसाठीच्या पोस्ट. अशीच एक खास पोस्ट अंकितने नुकतीच केली आहे.

या पोस्टमध्ये अंकितने रुचि आणि त्याच्या लग्नातील काही खास क्षण शेयर केले आहेत. या व्हिडीओत अंकित आणि रुचिच्या लग्नातील काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. त्यावेळी दोघांनी केलेला खास डान्सही पाहायला मिळतोय.

 

या पोस्टमध्ये अंकित लिहितो की, "माझी बायको.. असं मी सारखं सारखं म्हणेन.. माझी बायको रुचि.. जेव्हा चांदनी चौक महाराष्ट्राला भेटते" ही पोस्ट पाहुन रुचिसुद्धा आनंदी झाली आहे. तिनेही या पोस्टवर कमेंट करुन हे खूप क्यूट असल्याचं म्हटलय.

2015 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. याशिवाय दोघांनी एकत्र कामही केलय. 'घर आजा परदेसी' या मालिकेत दोघं एकत्र झळकले होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive