By  
on  

'सैराट' फेम लंगड्या उर्फ तानाजी गळगुंडेने या कारणासाठी केलं न्यूड फोटोशूट

'सैराट' या मराठी चित्रपटाची आठवण आजही कायम आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद, कलाकार यांची जादू आजही कायम आहे. सैराटची लोकप्रियतेत या चित्रपटातील कलाकारांची लोकप्रियताही वाढत गेली. आर्ची आणि परश्यासह या चित्रपटातील इतर पात्रेही लोकप्रिय ठरली. 

'सैराट'मधील लंगड्या ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे हा चांगलाच लोकप्रिय ठरला. हाच तानाजी पुन्हा चर्चेत आलाय तो एका खास फोटोशूटमुळे. रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी नुकतच त्याने एक फोटोशूट केलय. शरीराची सकारात्मकता या विषयावर हे खास फोटोशूट करण्यात आलय.

 

या फोटोशूटसाठी तानाजीचं महत्त्वाचं वाक्य यात नमूद करण्यात आलय. की,  "माझ्या पायाची रचना नीट नसेल पण माझ्या संगीताची आहे. मी स्वत:च्या सुरात मी उत्कृष्ट आहे. कारण मी मी आहे."  

तानाजीच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलय. रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाच्या विषयांना अधोरेखीत करत विविध फोटोशूट केलय. याआधी अभिनेत्री वनीता खरातने केलेलं न्यूड फोटोशूटही चर्चेत आलं होतं. आता तानाजीचा न्यूड फोटोही चर्चेत आलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive