By  
on  

सुबोध भावेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना झाला आनंद, घेऊन येणार नवीन काहीतरी..

अभिनेता सुबोध भावे त्याच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध भूमिकेतून भेटीला येत असतो. अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सुबोधने प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. नुकतच 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून सुबोधने खलनायक साकारुन प्रेक्षकांना चकित केलं होतं. 'तुला पाहते रे' या मालिकेतील सुबोधने साकारलेला खलनायक प्रेक्षकांना आवडला होता. 'विजेता' या चित्रपटानंतर सुबोध कोणत्या चित्रपटात झळकणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

आता पुन्हा एकदा सुबोध प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतोय असच चित्र पाहायला मिळतय. सुबोधने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये फोटो शेयर करत सुबोधने नवं काहीतरी घेऊन येत असल्याचं सांगितलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

सुबोधची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय. अनेकांनी सुबोधला शुभेच्छाही दिल्या आहेत. या पोस्टमध्ये लिहीलय की, "तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा चेहऱ्याला रंग! आता नवीन काहीतरी..." 

तेव्हा आता हे नवीन काहीतर नेमकं काय असणार ? चित्रपट की मालिका ? की कोणता कार्यक्रम ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive