धक्कादायक ! कला दिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या, व्हिडीओतून लेबर यूनियनच्या व्यक्तिला ठरवलं जबाबदार

By  
on  

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलय. ही आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी आत्महत्येचं कारण स्पष्ट केलय. कामात अडथळा निर्माण करणाऱ्या लेबर यूनियनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी जबाबदार ठरवलय. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतय. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे.

आत्महत्येपूर्वी राजेश सापते यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत आपली व्यथा सांगत आत्महत्येचं कारण सांगितलय. ते या व्हिडीओत म्हणतात की, "नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा."

 

आत्महत्येपूर्वी न्याय मिळण्याची मागणी राजेश सापते यांनी या व्हिडीओतून केली आहे. 

Recommended

Loading...
Share