By  
on  

पाहा Video : किशोरी शहाणे यांचा मुलासोबत धमाकेदार डान्स, 'कोंबडी पळाली' गाण्यावर धरला ठेका

अभिनेत्री किशोर शहाणे या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्याच्या कामाविषयीच्या अपडेट्स फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्या सोशल मिडीयावर शेयर करतात. शिवाय सेटवरील गमती जमती देखील त्यांच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. सहकलाकारांसोबतचे त्यांचे व्हिडीओही चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. मात्र यंदा त्यांनी हा व्हिडीओ एका खास व्यक्तिसोबत केला आहे.

ही खास व्यक्ति म्हणजे किशोरी शहाणे यांचा मुलगा. किशोरी यांनी नृत्याची प्रचंड आवड आहे. मराठी मनोरंजन विश्वात त्या उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळखल्या जातात. शिवाय त्यांचा मुलगा बॉबीदेखील उत्तम डान्स करतोय. म्हणूनच की काय त्यांनी सोशल मिडीयावर नुकताच केलेला रील व्हिडीओ हा मुलासोबत केला आहे. या व्हिडीओत किशोरी या त्यांच्या मुलासोबत थिरकताना दिसतायत. 

 

'कोंबडी पळाली..' या प्रसिद्ध लोकप्रिय मराठी गाण्यावर किशोरी आणि मुलगा बॉबी यांनी ठेका धरलाय. दोघांचा उत्तम डान्स आणि आई-मुलाच्या जोडीने या व्हिडीओतून नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. बॉबीसोबत त्याच ऊर्जेने किशोर थिरकताना दिसतायत. दोघांची ही डान्स जोडी उत्तम दिसतेय. 

हा व्हिडीओ अनेकांना आवडलाय. शिवाय व्हिडीओवर लाईक्सचा वर्षावही होत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive