By  
on  

पाहा Photos : "तू तिथे मी" म्हणत सुबोध भावेने लग्नाच्या वाढदिवसाला शेयर केले हे खास फोटो

अभिनेता सुबोध भावेचे असंख्य चाहते आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील त्याचा अभिनय कायम लक्षवेधी ठरतो. सुबोध भावेच्या रील लाईफ भूमिकांना जसा प्रतिसाद मिळतो तसाच त्याचं रियल लाईफ सोशल मिडीयावर पसंत केलं जात. सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे ही जोडीही पसंत केली जाते. या रियल लाईफ गोड जोडीच्या लग्नाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सोशल मिडीयावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच आहे. शिवाय सुबोध भावेची पोस्टही लक्षवेधी ठरतेय. 

लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्ताने सुबोधने पत्नीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.

या पोस्टमध्ये सुबोधने लग्नाचे काही खास क्षण शेयर केले आहेत. 

या पोस्टमध्ये सुबोध लिहीतो की, "लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप काही न लिहिता "तू तिथे मी" इतकंच"

या फोटोंमध्ये सुबोध आणि मंजिरी भावे यांच्या लग्नातील गोड क्षण पाहायला मिळत आहेत. चाहत्यांनीही या खास फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive