By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पति झळकला फरहान अख्तरच्या 'तूफान' सिनेमात

अभिनेता फरहान अख्तरच्या तूफान या सिनेमाच सर्वत्र चर्चा आहे. ही एक स्पोर्ट ड्रामा फिल्म असून अभिनेता फरहान अख्तर या सिनेमात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. फरहानसह अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि परेश रावल या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात खऱ्याखुऱ्या बॉक्सर्सचाही समावेश करण्यात आलाय.

याशिवाय एका मराठी अभिनेत्रीचा पति या सिनेमात बॉक्सिंग करताना दिसतोय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे मानसी नाईक. अभिनेत्री मानसी नाईकचा पति प्रदीप खरेरा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतोय.

या सिनेमातने त्याने बॉक्सरची भूमिका निभावली आहे. खऱ्या आयुष्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सर असलेला प्रदीप या सिनेमातील काही थरारक बॉक्सिंग सीनमध्ये दिसतोय. 

प्रदीपच्या या यशासाठी आनंदी असलेल्या मानसीने त्याच्यासाठी खास पोस्टदेखील केली आहे. या सिनेमादरम्यान प्रदीपची फरहान अख्तरसोबत अनेकदा सेटवर भेट झाली आहे. प्रदीपचे फरहानसोबतचे फोटो मानसीने शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये ती लिहीते की "माझा तूफान, मला तुझा अभिमान आहे."

याशिवाय प्रदीपने सोशल मिडीयावर या सिनेमातील तो खास सीनही सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. 

सोशल मिडीयावर मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा ही जोडी कायम चर्चेत असते. याचवर्षी 19 जानेवारी, 2021 रोजी मानसी आणि प्रदीपने लगीनगाठ बांधली होती. मागील वर्षी सोशल मिडीयावर पोस्ट करून मानसीने प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive