पाहा Video : सुबोध भावेच्या या हटके लुक्सनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोधने आत्तापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांतून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. शिवाय सोशल मिडीयावरही सुबोधचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र सुबोध भावेने सोशल मिडीयावर असं काही पोस्ट केलं की ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

सुबोध भावेने नुकतच एका फॅशन ब्रँडच्या जाहिरातीसाठी फोटोशुट केलय. या फोटोशुटमध्ये सुबोध भावेचा हटके लुक आणि स्टाईल पाहायला मिळतेय. पांढऱ्या रंगाचा धोती कुर्ता, चष्मा अशा या लुकमध्ये सुबोधचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय. शिवाय हे फोटो सुबोधने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

सुबोध या पोस्टमध्ये लिहीतो की, "आपल्याला आवडणारा पेहेराव आपल्यासाठी कोणी बनवला तर त्या सारखा आनंद दुसरा नाही."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

तर दुसरीकडे नुकताच एक व्हिडीओ शेयर करून आणखी स्टाईलिश लुक पाहायला मिळतोय. सुबोध भावेचा असा अंदाज याआधी त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला नाहीय. म्हणूनच चाहत्यांनी या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केलाय.

Recommended

Loading...
Share