महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती पाहुन अभिनेता सिद्धार्थ जाधवने घेतला हा निर्णय

By  
on  

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान झालय. अनेक भागात पाणी साचून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. यात अशा अडचणीत या पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडीयाचा वापर करणार आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरताना अनेकदा पाहायला मिळतं. पण याच सोशल मिडीयाचा वापर करून संकटात असलेल्या लोकांपर्यंत मदतही पोहोचवता येते. म्हणूनच अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मिडीयाचा योग्य वापर करण्याचं ठरवलं आहे.

नुकतच सिद्धार्थने सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट केली आहे. सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "नमस्कार.. या पुढचे दिवस माझ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फक्त माझ्या महाराष्ट्रातल्या आपल्या माणसांपर्यंत मदत कश्या पोहचतील यासंदर्भातील माहीत पोहचवणार आहे.. चला एकत्र येवू.. आपल्या माणसांसाठी.'

 

मनोरंजन विश्वातील कलाकार हे सोशल मिडीयावर त्यांचे फोटो, व्हिडीओ, प्रमोशनविषयी पोस्ट करताना दिसतात, मात्र अशा संकटकाळात या माध्यमाचा वापर करुन मदत पोहोचवण्यासाठीची माहितीही पोहोचवता येते. म्हणूनच कलाकार मंडळी सोशल मिडीयाचा असा सकारात्मक वापर करताना दिसत आहेत. 

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा यापुढे काही दिवस त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरून महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती आणि त्यासाठी मदत पोहोचवण्याविषयी माहिती पोस्ट करताना दिसेल. 

Recommended

Loading...
Share