झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं.. अभिनेते सयाजी शिंदे यांचा नवा अभिनव उपक्रम

By  
on  

वृक्षसंवर्धक म्हणून ओळख असलेले अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्याच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या संवेदनेतून ते आणखी एक नवा उपक्रम राबवत आहेत.  सहयाद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावत लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला महाराष्ट्रभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्थाही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. 

राष्ट्रांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी राज्यभरात 28,813 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतिच्या अखत्यारीत असलेल्या गावांत लोकसहभागातून प्रत्येकी 100 स्वदेशी वाणाच्या झाडांचे रोपण व संगोपन करत एका नव्या अर्थाने राष्ट्रध्वजास सलामी द्यायचा मानस आहे. जी गावं पाचशे वृक्ष किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष जोपासतील, त्यांना सह्याद्री देवराईच्यावतीने "विशेष गौरव" देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं या उपक्रमाचं स्वरुप आहे. शिवाय हा उपक्रम राबविण्यासाठी सहयाद्री देवराई कडून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र  विभाग पातळी वर समनव्ययक नेमले असून त्यांच्या मार्फत विभागातील सरपंच व स्थानिक लोकांना मार्गदर्शन केले जात आहे.

वृक्षसंवर्धनासाठी सतत झटणारे अभिनेते सयाजी शिंदे कायम विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या नव्या उपक्रमालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. 

Recommended

Loading...
Share