या थरारनाट्याच्या निमित्ताने मुक्ता बर्वे आणि उमेश कामत पुन्हा एकदा आले एकत्र

By  
on  

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत ही जोडी पुन्हा एकदा पसंत केली जात आहे. तर आता पुन्हा एकदा दोघं एका नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र काम केलय.‘स्टोरीटेल मराठी’ या प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘61 मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात समोर येणार आहेत. याशिवाय ओंकार गोवर्धन, समीर पाटील हे कलाकारही या ऑडिओ ड्रामात आहेत. ‘कौल’ हा सिनेमा गाजवणाऱ्या रोहित कोकाटेची या ऑडिओ ड्रामामध्ये विशेष भूमिका आहे.

मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांना किडनॅप करून एकाच खोलीत ठेवण्यात आलय. ठार अंधारात अखेर स्पीकरवरून एक घोषणा दिली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच पूर्वायुष्याशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो आणि त्यातूनच सुरु होतं एक थरारनाट्य.  ते कोडं त्यांना सुटतं का? 61 मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं गेलंय? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘61 मिनिट्स’  ऑडिओ ड्रामामध्ये ऐकायला मिळणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

अभिनेता उमेश कामतनं या ऑडिओ ड्रामाविषयी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "61 Minutes - समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर? मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता. पण ‘त्याने’ मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..!‘६१ मिनिटं’ दिलीयेत ‘त्याने’ कोडं सोडवायला. सुटेल का ते कोडं? अन् ‘तो’ च्यायला आहे तरी कोण??"

युवा लेखक तुषार गुंजाळच्या लेखणीतून ‘६१ मिनिट्स’ हे थरारनाट्य उतरले आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या तुषारनेच या ऑडिओ ड्रामाचे दिग्दर्शनसुद्धा केलेले आहे.

Recommended

Loading...
Share