पाहा Photo : थेट नऊवारी नेसून लंडनच्या रस्त्यांवर या अभिनेत्रीची अशी भटकंती

By  
on  

'डान्सिंग क्वीन' या डान्स रिएलिटी शोमध्ये झळकलेली अभिनेत्री कृतिका गायकवाड ही सोशल मिडीयावर विविध कारणांसाठी चर्चेत असते. विशेषकरून कृतिकाचे फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. कधी अंगावर वृत्तपत्राचा ड्रेस घालून केलेलं फोटोशूट तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर योगा पोझ दिलेलं फोटोशूट हे व्हायरल होत असतात. कृतिका पुन्हा एकदा तिच्या फोटोशूटसाठी चर्चेत आली आहे.

कृतिकाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये कृतिका मराठमोळ्या लुकमध्ये दिसतेय.

नऊवारी साडी आणि नथ असा मराठमोळा साज कृतिकाने केलाय. 

एवढच नाही तर या फोटोशूटचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्रीयन लुक करून कृतिका ही लंडनच्या रस्त्यांवर पोझ करत होती.

लंडनमधील विविध ठिकाणी कृतिकाने नऊवारी लुकमध्ये पोझ देऊन फोटोशूट केलय. 

सोशल मिडीयावर कृतिकाच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरु आहे. थेट लंडनच्या रस्त्यांवर नऊवारी नेसून केलेली ही भटकंती चर्चेचा विषय ठरतेय.

Recommended

Loading...
Share