By  
on  

या कारणासाठी सलील कुलकर्णी म्हणतात "अजून माझं ठरतंय की डॉक्टरी करायची का गाणं"

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांची अनेक गाणी प्रेक्षकांना कायम श्रवणीय वाटतात. शिक्षणाने डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले. सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच सांगितीक प्रवासाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. सलील कुलकर्णी यांना त्यांचं पहिलं गाणं स्वरबद्ध करुन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

याच निमित्ताने सलील कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ते लिहीतात की, "परवा अचानक माझे काही विद्यार्थी आणि आमचा आदित्य आठल्ये आणि माझा भाचा अश्विन म्हणाला , तू पहिलं गाणं स्वरबद्ध करून २५ वर्ष झाली ... आठवणींची साठवण करूया .. !! वेबसिरीज करायची म्हटले सगळे ... अरे पण ..आत्ता आत्ता तर झालंय सगळं .. म्हणजे ...मला तर कायनेटिक होंडा वर पुढे पेटी ठेवून कार्यक्रमाला जाणारा आणि आज नवीन चाल लोकांना आवडेल का असा विचार करत सिग्नलला थांबलेला " मी " दिसतोय .. !!" भावसरगम " ला बाल्कनीत प्रेक्षकांत बसून .. " सरणार कधी रण " ओरडणारा आणि १०० वेळा कार्यक्रम पाहिला तरीही हृदयनाथजींना भेटायची हिम्मत न होऊ शकलेला " मी " दिसतोय !! वृत्तपत्रात आपलं नाव छापून आलं म्हणून पेपर चा तो तुकडा कापून ठेवलेला " मी " आठवतोय. आणि ... आरशात बघून स्वतःशी बोलणारा आणि एक दिवस आपली गाणी लोकांच्या तोंडी असतील असं स्वप्नं बघणारा "मी " आठवतोय"

सलील कुलकर्णी पुढे लिहीतात की, "आई शप्पथ .. 25 वर्ष झाली .. ? 1996 च आहे अजून माझ्या मनांत ...अजून माझं ठरतंय कि डॉक्टरी करायची का गाणं ..."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive