अभिनेत्री गायत्री दातार आपल्या मनमोहक सौंदर्यांने आणि अफलातून विनोदांनी सध्या चला हवा येऊ द्याच्या मंचावरुन रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. 'तुला पाहते रे' मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
गायत्रीने नुकतेच खास पैठणीतले काही सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गुलाबी रंगाची पैठणी साडी त्यावर साजेसा हिरव्या रंगाचा ट्रेंडी ब्लाऊज आणि सुंदर दागिने परिधान केलेल्या गायत्रीच्या सौंदर्याला या साजात चार चॉंद लागले आहेत.
गायत्रीच्या या पैठणीतील लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांनी तिच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.