मनसेकडून मारहाण झालेले शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत; आदेश बांदेकरांचं स्पष्टीकरण

By  
on  

सिनेसृष्टीत कास्टींग काऊचच्या घटना समोर येत असतात. आताही कास्टींग काऊचची नवीन घटना समोर येताना दिसते आहे. उत्तर प्रदेशमधील काही लोकांनी निर्माते असल्याचे भासवत मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना पकडून बेदम चोप दिला. या दरम्यान या चौघांमधील एकजण हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे. 

 

 

पण शिवसेना चित्रपटसेना अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये आदेश म्हणतात, ‘काही ठिकाणी ठाणे कास्टिंग काउच करणारी व्यक्ती ही शिवसेना चित्रपटसेनेची पदाधिकारी आहे, अशी चुकिची बातमी समोर आणली जात आहे. शिवसेना चित्रपटसेनेचे सर्वच पदाधिकारी अत्यंत जबाबदारीने वागत असतात. हे गैरकृत्य करताना ठाण्यात पकडल्या गेलेल्या व्यक्तीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. तो शिवसेने चित्रपट सेनेचा पदाधिकारी नाही. तसेच ही खोटी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.’

Recommended

Loading...
Share