'सिटी ऑफ ड्रिम्स 2' मधील भूमिकेसाठी आदिनाथ कोठारेवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By  
on  

'सिटी ऑफ ड्रिम्स'चं दुसरं सिझन नुकतच प्रदर्शित झालय. नागेश कुकुनूर दिग्दर्शित या वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान ही मुख्य स्टारकास्ट या सिरीजमध्ये झळकतेय.

अभिनेता आदिनाथ कोठारेचेही सरप्राईजिंग भूमिका या सिरीजमध्ये पाहायला मिळतेय. आदिनाथ या सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय. या सिरीजसाठी त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यासाठी आदिनाथने सोशल मिडीयावर पोस्ट करून आनंद व्यक्त केलाय. 

दिग्दर्शक नागेश कुकुनूर आणि इतर स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव आदिनाथने सोशल मिडीया पोस्टमध्ये शेयर केलाय. याविषयी आदिनाथ या पोस्टमध्ये लिहीतो की, "मिळणारा प्रतिसाद आणि कौतुकामुळे मी अत्यंत भारावून गेलोय. धन्यवाद नागेश सर, तुमच्यासोबत काम करताना निखळ आनंद आणि सखोल अनुभव मिळालाय. धन्यवाद प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर आणि संपूर्ण स्टारकास्ट यांचा चांगला सपोर्ट मिळाला."

आगामी काळात विविध प्रोजेक्टमधून आदिनात विविध भूमिकांमधून समोर येणार आहे. आगामी '83' या बॉलिवुड सिनेमात आदिनाथ हा क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय 'पंचक' या आगामी सिनेमातही आदिनाथ झळकणार आहे.

 

Recommended

Loading...
Share