महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने यंदा मे महिन्यात दुबईत फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नगाठ बांधली. सोनाली आणि कुणाल हे सेलिब्रिटी कपल सध्या नवविवाहित दाम्पत्य आहेेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आता येणारा प्रत्येक प्रसंग-सण हा खासच असणार आहे. सोनालीचा पती कुणालचा लवकरच वाढदिवस येतोय.
लग्नानंतर कुणालचा हा पहिला वाढदिवस. म्हणून सोनालीने खास पतीसाठी सरप्राईज देण्याचं ठरवलंय. कुणालचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघं नुकतेच मालदीवला रवाना झाले आहेत.
सोनालीने म्हणूनच मालदीव ट्रीप्ससाठी निघतानाचा खास एअरपोर्ट लुक चाहत्यांशी शेअर केला आहे.
या लेमन कलरच्या टू पीसमध्ये आणि ब्लेझरने सोनाली खुपच झक्कास दिसतेय. त्यासोबतच तिच्या वेस्ट बेल्ट बॅगने चाहत्याचं लक्ष वेधलं आहे.
सोनालीचा हा एअरपोर्ट लुकमध्ये तिने मंगळसूत्रालासुध्दा खास स्थान दिलं आहे. नाजूक मंगळसूत्र या लुकची शोभा वाढवतंय.
सोनालीच्या या एअरपोर्ट लुकवर चाहतेच काय सेलिब्रिटींनीसुध्दा लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली आणि कुणाल दोघांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे दोघं जगभरात विविध ठिकाणी फिरत असतात आण तेथील सुंदर फोटो चाहत्यांशी शेअर करतात.