By  
on  

अभिनेता सुबोध भावेच्या या सिनेमाला पूर्ण झाली 3 वर्षे

आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेचा पुष्पक विमान हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला होता. या सिनेमातून अभिनेता सुबोध भावे हा अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत झळकला होता. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती सुबोध भावेने केली होती. याशिवाय अभिनेत्री गौरी किरणही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

आजोबा आणि नातवंड यांच्यातील नातं या सिनेमात सुंदर पद्धतिने दाखवण्यात आले होते. तात्या आणि नातू विलासची ही कथा अतिशय रंजक होती. विमानात प्रवास करण्यासाठीचा तात्यांचा नातवंडांकडे हट्ट आणि तो प्रवास कसा होतो याचं चित्रण या सिनेमात दाखवण्यात आलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

या सिनेमाला नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने सोशल मिडीयावर या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. पुष्पक विमान सिनेमाचं पोस्टर शेयर करत सुबोध लिहीतो की, "३ वर्ष
"पुष्पक विमान" ची. आजोबा आणि नातवाच्या नात्याचा अनोखा प्रवास!"

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. या सिनेमाला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलाकारांनी सोशल मिडीयावर आठवणींना उजाळा दिलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive