कोण आहे शीलावती ? बिग बॉस मराठीच्या या स्पर्धकांनी शिव ठाकरेला विचारला प्रश्न

By  
on  

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. हे कारण आहे शिवचं आगामी गाणं. आगामी गाण्यातून शिव हटके अंदाजात दिसणार आहे. शीलावती हे त्याचं नवं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच गाण्याच शिव हा जोरदार प्रमोशन करतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मात्र या गाण्यातील शीलावती नेमकी आहे तरी कोण ? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. शिवनेही अद्याप या गाण्यातील शीलावतीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे या गाण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमधील शिवचे मित्र-मैत्रीण असलेल्या स्पर्धक कलाकारांनीही शिवला शीलावती विषयी विचारलय. थोडक्यात त्यांनीही शिवच्या या आगामी गाण्याचं प्रमोशन केलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनचे स्पर्धक पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकरसह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर शीलावती नेमकी आहे तरी कोण अशी विचारणा करत शिवच्या या गाण्याचं प्रमोशन केलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

यासह अभिनेता सिद्धार्थ जाधव, समीर चौगुले, किशोरी शहाणे, नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांनीही शिवच्या या नव्या गाण्यासाठी प्रमोशन केलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मात्र आता ही शीलावती आहे तरी कोण हा प्रश्न कायम आहे. शिवने विविध फोटोंमधूनही क्लू देण्याचा प्रयत्न केला असला तरी शीलावतीचा चेहरा काही दिसलेला नाहीय. तेव्हा या गाण्याच्या निमित्ताने शिव नेमका कोणत्या अभिनेत्रीसोबत झळकणारेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share