By  
on  

राज कुंद्रा प्रकरणात या मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, राजच्या प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा झाल्याचा केला खुलासा

सध्या सगळीकडे एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे ते म्हणजे राजु कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी. अश्लील चित्रफित निर्मिती प्रकरणात व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पति राज कुंद्राला 19 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राने पॉर्न चित्रफितची निर्मिती करुन त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये एक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात एप्लिकेशन लंडनमधील केनरीन कंपनीला विकण्यात आले होते. आता अश्लील चित्रफित निर्मितीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजला 27 रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलय.

या प्रकरणात विविध नावं समोर येत असताना आणि राजच्या प्रोडक्शन हाऊसकडून अनेक अभिनेत्रींना विचारणा झाल्याचंं समोर येत असताना एका मराठी अभिनेत्रीचं नाव समोर आलय. राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसकडून ऑफर आल्याचा खुलासा या मराठी अभिनेत्रीने केला आहे.

ही अभिनेत्री आहे मनिषा केळकर. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनिषा केळकरने हा खुलासा केला आहे. राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसकडून फोटो आणि व्हिडीओची मागणी करण्यात आल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलय. ती या मुलाखतीत म्हटलीय की, "राज कुंद्राचं प्रोडक्शन हाऊस असल्याने मला वाटलं नावाजलेलं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे मी त्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे फोटोंची मागणी केली शिवाय काही व्हिडीओ शूट करणार असल्याचं ते म्हटले." शिवाय या व्हिडीओची काही कथा किंवा थीम आहे का असही मनिषाने त्यांना विचारले होते. मात्र त्यावर तिला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने ऑफर नाकारल्याचं ती सांगते. फक्त वेबसाईटवर आपले व्हिडीओ आणि फोटो टाकले जाणार या कल्पनेने तिला विचार करायला भाग पाडलं आणि तिने थेट नकार दिला. 

मनिषाने राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसला योग्य वेळी नकार दिल्याने ती या प्रकरणात अडकण्यापासून वाचलीय. या प्रकरणात गोंधळ असल्याचा संशय मनिषाला आधीच आला होता. त्यामुळे तिने योग्य वेळी ही ऑफर नाकारली. ज्या नंबरवरुन मनिषाला या ऑफरसाठी कॉल येत होता त्या नंबरचा तपास केल्यावर तो नंबर नायजेरियाचा असल्याचं तिच्या लक्षात आल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलय. अशा गोष्टीत सतर्क राहणं गरजेचं असल्याचही ती सांगते. याशिवाय अशात सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही तिने दिलाय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive