By  
on  

अभिनेता श्रेयस तळपदेसह नव्या मालिकेत झळकणारी ही गोड चिमुकली कोण आहे, माहितीय?

झी मराठी वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे ब-याच काळानंतर अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याच्याच “माझी तुझी रेशीमगाठ”  या नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे. पण तो पाहताना लहान-थोर सारेच जण थबकून अय्या किती गोड.. असं म्हणायला अजिबात विसरत नाही. कारणसुध्दा तसंच आहे.
 

 या प्रोमोमध्ये श्रेयसवर आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु करणारी आणि त्याच्याबरोबर डेटवर आलेली गोंडस चिमुकली सध्या चर्चेचा विषय ठरतेय. या नव्या मालिकेत झळकणारी ही चिमुकली कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

“माझी तुझी रेशीमगाठ” ह्या मालिकेत श्रेयश तळपदेला लग्नाची बोलणी करायला आलेल्या या चिमुकलीबदल्ल जाणून घेऊयात. “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत झळकणा-या ह्या गोड मुलीचं नाव आहे “मायरा वायकुळ”. मायराला तुम्ही ह्या पूर्वी अनेक सोशल मिडीयावरील व्हिडीओंमध्ये  पाहिलं आहे. 

. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. तिला इन्स्टा क्वीनही म्हणतात. 

मायराच्या  व्हिडिओंना लाखो हिट्स मिळताच शिवाय खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन चाहते प्रोत्साहित करतात.

 मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते.

मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत मायराच्या नवनव्या कंटेंट्सना प्रोत्साहन देतात. 

आता मायराला झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे ह्या दोन प्रसिद्ध कलाकारांसोबत छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे. त्यामुळेच तिचे सर्व चाहते प्रचंड खुश झाले आहेत. 


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive