अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे विविध लुक आजवर पाहायला मिळाले आहेत. सोशल मिडीयावरही तेजस्विनी तिचे विविध आउटफिटमधील लुक शेयर करत असते. कधी साडीतील सुंदर लुक तर कधी वेस्टर्न आउटफिटमधील तिचे लुक पसंत केले जातात.
तेजस्विनीने नुकतेच शेयर केलेले लुक सध्या सोशल मिडीयावर पसंत केले जात आहेत. या लुकमध्ये ट्रॅक सूट आणि क्रॉस कॅप असा तिचा लुक पाहायला मिळतोय.
पहिल्यांदाच तेजस्विनीचा असा स्वॅग लुक पाहायला मिळालाय. सोशल मिडीयावर या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाी तेजस्विनीच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह तेजस्विनीच्या मित्र-मैत्रीणींना या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.