अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मराठीसह हिंदी सिनेमांमधील त्यांच्या विविध भूमिकांनी त्याने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक आणि चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत. अभिनय आणि नृत्यासह सिद्धार्थला फॅशनमध्येही विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण झालीय.
विविध सोहळे आणि फोटोशूटमधील पेहरावात सिद्धार्थ विविध प्रयोग करताना दिसतो. त्याचे हटके पेहराव कायम लक्षवेधी ठरतात.
सिद्धार्थच्या फोटोशूटमधील त्याचा हटके पेहराव, लुक आणि स्टाईल ही चर्चेचा विषय ठरते. असेच चर्चेत आलय त्याने नुकतच केलेलं फोटोशूट.
या फोटोशूटमध्ये सिद्धार्थचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. पिवळ्या रंगाची थिम असलेलं फोटोशूट आहे. पिवळ्या रंगाचे चेक्स लाईनमधील सूट, पांढरे शूज आणि पिवळा मोठा गॉगल असा हा लुक आहे. अशा वैविध्यपूर्ण लुक्समधील सिद्धार्थ चाहत्यांना प्रचंड आवडतोय. या फोटोंवर सोशल मिडीयावर लाईक्सचा वर्षाव झालाय.