अस्वस्थ रंगकर्मींनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी दादर येथील स्व. दादासाहेब फाळके स्मारकाजवळ आंदोलन केले होते. या आंदोलनाला मुंबईसह महाराष्ट्राभरातील विविध ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभला आणि त्याचे पडसाद मंत्रालयात देखील उमटले.
मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने नुकतच अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. अमित देशमुख यांच्यासोबत बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यावेळी विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, सुभाष जाधव, चंद्रशेखर सांडवे, उमेश ठाकूर, शीतल माने, अमिता कदम आदी उपस्थित होते. आंदोलनकारकांच्या मागण्यांचा या बैठकीत सकारात्मकतेने विचार करण्यात आला असून त्यातील बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.