देवमाणूस ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. या मालिकेतला बालकलाकार टोन्याची धम्माल-मस्ती तर अवघ्या महाराष्ट्राला आवडतेय.
सरु आज्जीची खोड काढणारा, मम्मीचे फटके खाणारा आणि डिंपल दीदीकडे मोबाईल फोनसाठी तगादा लावणारा टोन्या भाव खाऊन जातोय
बालकलाकार विरल माने याने टोन्याची ही भन्नाट व्यक्तिरेखा साकारत देवमाणूस मालिकेची रंगत वाढवलीय.
विरल साकारत असलेला धम्माल टोन्या प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरतोय.
एका रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातंय.बालकलाकार विरळ माने एका भागासाठी 10 हजार रुपये आकारतो.
मालिकेतील टोण्या हा सगळ्यापेक्षा वयाने लहान असला तरी त्याचं ही फॅन फॉलोविंग काही कमी नाही.
विरल हा मुळचा सातारा येथील मौजीनिगूडमाड येथे रहातो.
विरलला अभिनय आणि डान्सची प्रचंड आवड आहे.
विरल सोशल मिडीयावर बराच सक्रीय असतो.
आपले सहकलाकारांसोबतचे भन्नाट रील व्हिडीओ तो शेअर करतोय
सोशल मिडीयावर विरलचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
विरलची अभिनय कारकिर्द अशीच फुलत जावो, ही पिपींगमून मराठीकडून सदिच्छा.