निसर्गरम्य वातावरणात खास ट्रीप करायला कुणाला नाही आवडणार. अभिनेता अभिजीत खांडकेकरने अशाच एका खास ट्रीपची मजा लुटली आहे. त्याने केलेल्या लडाख ट्रीपचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून या ट्रीपचा प्रवास सुखद आणि आनंदी झाल्याचं पाहायला मिळतय.
नुकतच अभिजीतने एक खास व्हिडीओही शेयर केलाय. लडाखच्या या ट्रीपमधील खास गोष्टी तो शेयर करताना दिसतोय. यावेळी त्याने मिनी ट्रक चालवण्याचा आनंद शेयर केला.
अभिजीत म्हणतो की, "लदाख मध्ये मिनी ट्रक (बोलेरो) चालवण्याची संधी मिळाली…जसजसं तुम्ही उंचीवर जाता रस्ते अजुन खडतर होत जातात आणि वातावरण बेभरवशाचं. पण वाहन नेता येईल अश्या जगातल्या दुसऱ्या सगळ्यात उंच ( आता तिसर्या) रस्त्यावर ड्राईव्ह करून पोहोचणं ह्या सारखा आनंद नाही"
लडाखच्या या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मिनी ट्रक चालवण्याचा, तेथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद अभिजीतने सोशल मिडीयावर शेयर केलाय.