By  
on  

ऋता दुर्गुळे म्हणते "या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते"

मराठी मालिका आणि नाटकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीय. अनन्या या मराठी चित्रपटातून ऋता आता सिनेविश्वात पदार्पण करतेय. "शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे" अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. नुकताच या चित्रपटाचा नवा मोशन पोस्टर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात ऋताची प्रमुख भूमिका असून चित्रपटाचे लेखन प्रताप फड यांनी केलय. ध्रुव दास, रवी जाधव आणि संयय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. तर समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे. 

या पोस्टरमध्ये ऋताचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय. तिच्या डोळ्यांमध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी दिसणारे भाव लक्षवेधी ठरत आहेत. 


    
या चित्रपटाविषयी बोलताना हृता दुर्गुळे म्हणते की, '' मी खूपच खुश आहे. खरं तर या क्षणाची मी खूपच आतुरतेने वाट पाहात होते. कारण 'अनन्या'च्या माध्यमातून मी चित्रपटात पदार्पण करत आहे.  कोरोनाचा शिरकाव होण्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते आणि मागील दीड -दोन वर्षांत सगळेच अडकून होते. मुळात दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह आमच्या सर्वांचीच इच्छा होती की, 'अनन्या' थिएटरमध्येच रिलीज व्हावा. त्याचीच आम्ही वाट पाहात होतो. हळूहळू परिस्थिती निवळत असतानाच आता 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे.''

तेव्हा 'फुलपाखरु' ही मालिका किंवा 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक असो, या माध्यमातून ऋताचं अभिनयकौशल्य पाहायला मिळालं होतं. आता 'अनन्या' चित्रपटातून ऋताच्या अभिनयाची वेगळी छटा अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive