By  
on  

अप्सरेने केला नथीचा नखरा, खिळल्या सर्वांच्याच नजरा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ साधते. स्टायलिश राहण्यासोबतच सोनाली परंपरासुध्दा जपते. हे तिच्या अनेक फोटोशूटमून तिने सिध्द केलं आहे. सोनालीचे साडीतलं घायाळ करणार फोटोशूट आपण नेहमीच पाहिलंय. पण बोल्ड वनपिसवर सोनालीने केलेला नथीच्या नख-याचं हटके फ्युजन चाहत्याचं लक्ष वेधून घेतंय. 

 

 

 सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनालीने अलिकडेच तिचे काही जबरदस्त  फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

.या फोटोमध्ये सोनालीने शॉर्ट ड्रेस परिधान केला असून सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे. यावर तिने नथ घातली आहे. हा तिचा खुपच हटके लुक आहे. तर दुस-या फोटोत तिने एक बॅग कॅरी केली आहे. 

सोनालीच्या या स्टनिंग फोटशूटवर चाहते घायाळ झाले असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive