By  
on  

अनिरुध्दसोबत बोहल्यावर चढण्याची संजनाला आहे घाई, पोस्ट केलं ब्रायडल फोटोशूट

मराठी मालिकाविश्वात आई कुठे काय करते ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळतंय. घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांचं घर सोडून आईकडे डोंबिवलीला राहायला गेलीय. तर इथे गुडघ्याला बाशिंग बांधून संजना अनिरुध्दसोबत लग्नाच्या तयारीला लागलीय. कधी एकदा ती अनिरुध्दच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवतेय आणि देशमुखांच्या घरात येतेय असं तिला झालंय. 
 

 

मात्र मालिकेतील लग्नापूर्वी संजना फेम रुपाली भोसले हिने एक झक्कास ब्रायडल शूट करुन चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे. 

नवराईच्या रुपात सजलेली रुपाली खुपच सुंदर व मोहक दिसतेय. 

लाल रंगाचा लेहंगा आणि भरजरी दागिन्यांमध्ये रुपालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

रुपालीच्या या ब्रायडल फोटोशूटने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

पाहताच क्षणी प्रेमात पाडणारा असा  रुपालीचा हा ब्रायडल लुक आहे

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive