By  
on  

पाहा Video : 26/11 च्या घटनेवर आधारित सिरीजमध्ये झळकतेय मृण्मयी देशपांडे, साकारतेय डॉक्टरची भूमिका

'मुंबई डायरिज 26/11' ही हिंदी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. ही सिरीज मेडिकल ड्रामा सिरीज असून 26/11 च्या घटनेवर आधारित ही सिरीज आहे. ज्यात डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून 26/11 च्या हल्ल्याची कथा दाखवण्यात येईल. या हल्ल्यादरम्यान डॉक्टरांनीही मोठी कामगिरी बजावली होती. त्याविषयी या सिरीजच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील या सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

या सिरीजमध्ये मृण्मयी डॉक्टरची भूमिका साकारतेय. नुकताच या सिरीजचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. एका रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात मेडिकल स्टाफ कशा पद्धतिने मदद करतो याचं थरारक चित्रण या सिरीजमध्ये पाहायला मिळेल. अभिनेता मोहित रैना या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

 

या सिरीजच्या माध्यमातून मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याच्या संकटाचा सामना करणाऱ्या नायकांना श्रद्धांजली वाहण्याचा हा प्रयत्न असेल. मोहित रैना, मृण्मयी देशपांडेसह या सिरीजमध्ये कोंकणा सेन शर्मा, टीना देसाई आणि श्रेया धनवंतरी हे कलाकार पाहायला मिळतील. या सिरीजमधील मृण्मयीची भूमिका पाहणं लक्षवेधी ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive