By  
on  

पाहा Video : आगामी सिनेमातील रिंकूचा लुक पाहुन येईल 'सैराट'च्या आर्चीची आठवण

'सैराट' या मराठी सिनेमाने वेगळाच इतिहास घडवला. मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख देणाऱ्या सैराटी सिनेमातील आर्ची ही भूमिका प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली. अभिनेत्री रिंकू राजगुरुने या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं आणि आर्ची म्हणून तिची ओळख निर्माण झाली. रिंकू सध्या अनेक सिनेमा, सिरीजमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारतेय. त्यातीलच एक म्हणजे 'अनकही कहानिया' ही हिंदी फिल्म. या सिनेमात तीन प्रेमकथा दाखवण्यात आल्यात त्यापैकी एका कथेत रिंकू झळकतेय.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन सैराटच्या आर्चीची आठवण होतेय. तशीच साधीभोळी दिसणारी मात्र करारी सडेतोड वाटणारी आर्चीच जणू या सिनेमात आहे की काय असा भास होतो. मात्र या सिनेमातील रिंकूची ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. मात्र रिंकूच्या वागण्यात, दिसण्यात आर्चीची झलक पाहायला मिळतेय. त्यामुळे या सिनेमाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झालीय.

 

रिंकूने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शिक केलाय. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "प्रेमासाठी का आईस्क्रिम साठी ? लवकरच शोधा नेटफ्लिक्सवर. 'अनकही कहानिया' सप्टेंबर 17 ला प्रदर्शित होतेय."

या सिनेमात रिंकू अभिनेता देलझाद हिवलेसोबत झळकणार आहे. या प्रेमकथेत नेमकं काय पाहायला मिळेल हे सिनेमा रिलीजनंतर समोर येईलच. 17 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आगामी काळातही रिंकू अनेक हिंदी, मराठी प्रोजेक्टमधून समोर येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive