By  
on  

पाहा Trailer : या वेबसिरीजमध्ये दिसणार सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेची केमिस्ट्री

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे हे कलाकार लवकरच आगामी वेबसिरीजच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहेत. 'अधांतरी' असं या वेबसिरीजचं नाव असून या सिरीजच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकतील. 

नुकताच या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ आणि पर्णची जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. या सिरीजमध्ये लाँग डिस्टंन्समध्ये असलेले मुग्धा आणि मुकुल एकमेकांवर खूप प्रेम करतात. मात्र त्यांच्या आयुष्यात असं काही घडतं ज्याने त्यांना एकत्र रहाव लागतं. खास रोमँटिक ट्रीपवर असताना लॉकडाऊनची घोषणा होते. ज्यामुळे दोघांना 21 दिवस एकत्र रहावं लागतं. 

 

या सगळ्यात या दोघांचं प्रेम अनलॉक होईल का की नेमकं काय होईल हे या सिरीजमध्ये पाहणं रंजक ठरेल. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेने सोशल मिडीयावर या सिरीजचा ट्रेलर पोस्ट केलाय. जीत अशोक यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलय.

येत्या 25 ऑगस्ट रोजी ही सिरीज हंगामावर प्रदर्शित होत आहे. या सिरीजमधून सिद्धार्थ आणि पर्णची केमिस्ट्री पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाय एक वेगळा विषय मनोरंजनात्मक पद्धतिने मांडल्याने त्याची मजा काही औरच असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive