By  
on  

पाहा Photo : आदिनाथ कोठारेचे हे फोटो पाहुन तरुणींनी केला लाईक्सचा वर्षाव, फोटोंवर आल्या अशा कमेंट्स

अभिनेता आदिनाथ कोठारेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. मात्र नुकत्याच केलेल्या पोस्टने तरुणींना वेड लावलय. आदिनाथची ही पोस्ट पाहुन तरुणींनी लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव केलाय. 

आदिनाथने नुकतेच त्याचे काही शर्टलेस फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी जणू सोशल मिडीयाचं तापमान वाढवलय.

या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी विशेषकरुन महिला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एक नाही दोन नाही तर तब्बल तीन पोस्ट करून आदिनाथने त्याचे हे शर्टलेस फोटो शेयर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील त्याच्या मित्र-मैत्रीण कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता हेमंत ढोमे यांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.

आदिनाथच्या या फोटोंना बरेच लाईक्स मिळाले आहेत. आगामी काळात विविध सिनेमांमधून आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सिटी ऑफ ड्रिम्स 2' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिरीजमधील त्याच्या कामाचं कौतुक झालं. आगामी काळात '83' या हिंदी सिनेमात आदिनाथ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणारेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive