सिद्धार्थ चांदेकर मितालीसोबत व्हिडीओ करत असताना अचानक घडलं असं... पाहा मजेशीर व्हिडीओ

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही रियल लाईफ जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. याचवर्षी या गोड जोडीने लगीनगाठ बांधली होती. मनोरंजन विश्वात अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात. दोघांचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय.

हा गमतीशीर व्हिडीओ सिद्धार्थने सोशल मिडीयावर शेयर केलाय. या कॉमेडी व्हिडीओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातय.

 

दोघंही एका गाण्यावर व्हिडीओ करत असल्याचं यात पाहायला मिळतय. एकीकडे सिद्धार्थ त्या गाण्याचं लिपसिंग करत असताना मिताली अचानक ओरडते आणि सिद्धार्थ हा व्हिडीओ बंद करतो. आता यातली खरी गंमत हा व्हिडीओ पाहिल्यावर कळेलच.

असेच मजेशीर व्हिडीओ ही जोडी सोशल मिडीयावर शेयर करते. दोघांचाही सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. सिद्धार्थ आणि मिताली आजवर कधीच ऑनस्क्रिन एकत्र झळकले नसले तरी सोशल मिडीयावर त्यांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं.

Recommended

Loading...
Share